आयसीसी कसोटी रँकिंग, न्यूझीलंडच्या विल्यमसनची दुसऱ्या स्थानावर झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 251 धावांची संस्मरणीय खेळी साकारणाऱया केन विल्यमसन याने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (फलंदाजी) दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. आता तो हिंदुस्थानच्या विराट कोहलीसोबत दुसऱया स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीवन स्मिथ 911 रेटींगसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

– अव्वल पाचमध्ये फक्त जाडेजाच

विराट कोहली कसोटीतील फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱया स्थानावर आहे. त्याव्यतिरिक्त फलंदाज, गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये हिंदुस्थानचा एकमेव खेळाडू अव्वल पाचमध्ये आहे. तो म्हणजे रवींद्र जाडेजा. अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये रवींद्र जाडेजा तिसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स गोलंदाजांच्या रँकिंग तर इंग्लंडचा बेन स्टोक्स अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

n संघांच्या रँकिंगमध्ये चुरस

आयसीसी संघांच्या कसोटी रँकिंगमध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे. ऑस्ट्रेलिया 116 रेटींगसह पहिल्या, न्यूझीलंड 115 रेटींगसह दुसऱया आणि हिंदुस्थान 114 रेटींगसह तिसऱया स्थानावर आहे. या तिन्ही संघांमध्ये प्रत्येकी एक गुणाचा फरक आहे. त्यामुळे हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया यांच्यामधील आगामी कसोटी मालिकेचा निकाल आयसीसी रँकिंगच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

आयसीसी कसोटी रँकिंग

(अव्वल पाच फलंदाज)
स्टीवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 911 रेटींग
केन विल्यमसन (न्यूझीलंड) 886 रेटींग
विराट कोहली (हिंदुस्थान) 886 रेटींग
मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया) 827 रेटींग
बाबर आझम (पाकिस्तान) 797 रेटींग