
उद्योगपती कन्हैयालाल सराफ यांची लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सराफ यांना समाजसेवेसाठी 13 वेळा प्रशस्तीपत्रक, पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. गेली 45 वर्षे ते लायन्स इंटरनॅशनलशी जोडलेले आहेत. सांस्कृतिक-सामाजिक समायोजन ‘लोकमंगल’च्या माध्यमातून पत्रकार, साहित्यिक, आणि रचनाकारांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी आपले मोठे बंधू रामनारायण सराफ यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली केले.