Pulwama : कपिल शर्माने केली सिद्धूची पाठराखण, नेटकऱ्यांनी तुडवले

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा येथे लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पंजाबचे पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने वादग्रस्त वक्तव्य केले होते. “दहशतवाद हा एका धर्माचा किंवा देशाचा नसतो”, असे वक्तव्य करून पाकड्यांची तळी उचलून धरल्याने टीकेचे धनी झालेल्या सिद्धूला त्यानंतर कपिल शर्माच्या शोमधूनही हाकलून देण्यात आलो होते. पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच कॉमेडियन कपिल शर्मा याने प्रतिक्रिया देत सिद्धूची पाठराखण केली आहे.

चंदिगड येथे एका कार्यक्रमात बोलताना कपिल शर्मा म्हणाला की, ‘देशासमोरील जी समस्या आहे त्यावर योग्य उपाय करायला हवा. दहशतवादाच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. सिद्धूजींनी शो सोडावा हा जर यावरील उपाय असेल, तर ते स्वत: शोमधून बाहेर पडण्याएवढे हुशार नक्कीच आहेत. परंतु काही लोक #BoycottSidhu’ आणि #BoycottKapilSharmaShow’ असे हॅशटॅग वापरून लक्ष भरकटवण्य़ाचे काम करत आहेत.’

तसेच काही तरुणांकडून सोशल मीडियावर असा प्रोपोगंडा चालवण्यात येत असून मला यात पडायचे नसल्याचे कपिल म्हणाला. सिद्धूवरील कारवाईबाबक तू काही करणार आहे का असे विचारण्यात आले असता कपिल म्हणाला की, मी या शोचा प्रोड्यूसर नाही आणि हा सर्वस्वी चॅनेलचा निर्णय असल्याचेही तो म्हणाला. सिद्धूवरील कारवाई हा या समस्येवरून उपाय नसल्याचेही कपिल म्हणाला.

दरम्यान, कपिल शर्माने सिद्धूची पाठराखण केल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कपिलच्या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या