कपिल शर्माच्या शोमध्ये हास्य कवी संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कपिल शर्माच्या शोमध्ये हास्याचा डबल धमका आहे. शनिवारी व रविवारी होणाऱया या विशेष शोमध्ये देशातील नामवंत हास्य कवी सहभागी होणार आहेत. त्यात अंजुम रहबर, अरुण जेमिनी आणि प्रदीप चौबे यांचा समावेश आहे. या विशेष शोमध्ये आलेले दिग्गज कवी कविता, गझल सादर करुन मनोरंजन करणार आहे. हे कवी त्यांच्या आयुष्यातील विनोदी क्षणही शेअर करणार आहे. यामुळे प्रेक्षकांना त्यांच्यातील प्रतिभा व गुणांची माहिती अधिक जवळून होणार आहे. विशेष शोमध्ये साहित्य भारती पुरस्कार विजेते आणि उर्दू गझल करणारे प्रसिद्ध कवी अंजुम रहबर आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. त्यांच्या प्रत्येक गझलमधून एक लय व सुर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हरयाणातील कवी अरुण जेमिनी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या विशेष शोमध्ये ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या घटना शेअर करतील. यामुळे प्रेक्षकांची अधिकच चांगली करमणूक होणार आहे.