
महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत, मात्र मतदानापूर्वीच 69 ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला चिंता आहे का, असा सवाल काँग्रेसचे नेते व खासदार कपिल सिब्बल यांनी केला आहे.
बिनविरोध निवड झालेले बहुतांश उमेदवार हे भाजप आणि शिंदेंच्या गटाचे आहेत. पैसे देऊन तसेच पोलिसांच्या बळाचा वापर करून या ठिकाणी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या बिनविरोध निवडींवरून कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. सिब्बल म्हणाले की, एकूण 69 बिनविरोध निवडून गेलेल्या उमेदवारांपैकी 68 उमेदवार हे भाजप आणि शिंदे यांच्या गटाचे आहेत. हे पाहता देशातील निवडणूक व्यवस्था सध्या गंभीर संकटात आली आहे. पैसा आणि राजकीय वर्चस्व यांचाच निवडणुकीवर मोठा प्रभाव दिसत असून यातूनच निकालांची दिशा ठरवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाला याबाबत खरोखर चिंता आहे का, असा सवाल सिब्बल यांनी केला आहे.



























































