कराड विमानतळ दोन दिवसांपासून अंधारात, महावितरणकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष

कराडच्या विमानतळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, दोन दिवसांपासून हा परिसर अंधारात आहे. विमानतळ प्रशासन वारंवार वीज खंडित पुरवठय़ाच्या तक्रारी महावितरणकडे करत असले तरी महावितरणकडून तातडीने पावले उचलली जात नसल्याचे दिसत आहे.

कराड विमानतळाची देखभाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून केली जाते. विमानतळाच्या ‘रन-वे’सह परिसरात मोठे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्याचा उपयोग विमाने उतरण्यासाठी व उड्डाणासाठी होत असतो. मात्र, गेल्या काही महिन्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

विमानतळ प्रशासनाने दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र, महावितरणकडून तातडीने कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. या विमानतळावर शासकीय विमाने, महनीय व्यक्तींची विमाने उतरतात. त्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित होणे गंभीर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या