महिलांसह बालकांची तस्करी थांबवण्यासाठी ऍन्टी ह्यूमन ट्रॅफीकिंग सेलची स्थापना होणार

देह विक्रीच्यादृष्टीने महिलांसह अन्य अनेक कारणांसाठी लहान बालकांची अपहरणाव्दारे होणारी तस्करी आता रोखली जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत. महिला, बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध घालण्यासाठी ऍन्टी ह्यूमन ट्रॅफीकिंग सेलची स्थापना प्रत्येक पोलिस ठाण्यात करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे पोलिस ठाण्यांचाही समावेश केला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवरील पोलिसांसह नेहमीच्या 27 पोलिस ठाण्यांत पथकांची स्थापना होणार आहे.

पुरुष, महिला अशा दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश असणार आहे. युवती, महिलांच्या छेडछाडीसाठी निर्भया पथक कार्यरत आहेत. यानंतर ऍन्टी ह्यूमन ट्रॅफींकिंग पथकाव्दारे पुन्हा नवे पाऊल टाकले आहे. राज्यासह जिल्ह्यात महिला, बालकांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण गंभीर आहे. सदरची परिस्थिती लक्षात घेऊन यावर ठोस पावले उचलण्यासाठी शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

महिला, बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध घालण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी ऍन्टी ह्यूमन ट्रॅफीकिंग पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात असे पथक स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील 27 पोलिस ठाण्यांत अशा पथकांची स्थापना होणार आहे. नवीन मल्हारपेठ पोलिस ठाण्याचाही समावेश आहे. ऍन्टी ह्यूमन ट्रॅफीकिंग पथक 24 तास कार्यरत राहणार आहे.

याशिवाय हे पथक फिरतेही असणार आहे. पोलिस ठाण्यांतील उपलब्ध मनुष्यबळ देण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. या पथकात सहा जणांचा समावेश असेल. एक महिला, एक पुरुष फौजदार व चार कर्मचारी देण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यातील रेल्वे पोलिसांनाही ऍन्टी ह्यूमन ट्रफीकिंग पथकांची स्थापना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत

आपली प्रतिक्रिया द्या