कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा, कराड नगरपालिका प्रभाग समितीच्या बैठकीत निर्णय

517

कराड शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवाव्यात, असा निर्णय प्रभाग समितीच्या बैठकीत निर्णय झाला असून याबाबत तहसीलदार अमरदीप वाकडे आदेश काढतील.

सोमवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये कराड नगरपालिका शहर स्तरीय सुकाणू समिती व प्रभाग समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस शहरातील वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर्स आशा स्वयंसेविका, शहर नागरी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व डॉक्‍टर्स उपस्थित होते.

परराज्यातील मजूर तसेच प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही प्रमाणपत्रे सरकारी दवाखान्यात शिवाय खाजगी डॉक्टरही देऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी तसेच मजुरांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करू नये. खासगी रुग्णालय, डॉक्टर कडून ही प्रशस्तिपत्रे घ्यावीत, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. लोकांचा विश्वास डॉक्टर्स वर असल्याने कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी डॉक्टरनी पुढे यावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले व्हिडिओ तसेच अन्य संदेश पाठवून जनजागृती करावी, असे यावेळी ठरले. छत्रपती शिवाजी स्टेडियम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले की, कराड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीच्या आधारे नगरपरिषद काम करत आहे. यामध्ये कोणाच्या शहरात संसर्ग होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणे, शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रयत्न करणे तसेच शहराची सुरक्षा वाढवणे या दृष्टीने नगरपरिषद काम करत आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर शहरातील पुणे-मुंबईवरून सुमारे 1325 नागरिक आले आहेत. ज्यांची घरी सोय नाही, 25 नागरिकांना नगरपरिषदेच्या शाळेमध्ये ठेवण्यात आले आहे. येत्या काळात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे शहरामध्ये उपाय योजना कायम राखणे गरजेचे आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यादृष्टीने तयारी करावी. याबरोबरच ज्यांच्याकडे रुग्णवाहिका आहेत, त्या सज्ज ठेवाव्यात. नगरपालिका मीच माझा रक्षक हे अभियान राबवत असून यास सहकार्य करावे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले की पावसाळा सुरू झाला असून साथीचे आधार आणि कोविडची लक्षणे यात साम्य असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कुऱ्हाडे म्हणाले की, कोरोना आणि साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी परिपत्रके नागरिकांना वाटण्यात येतील. त्याचबरोबर शहरातील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रशस्तिपत्रे नेण्यासाठी लोक गर्दी करत असून त्याबाबत लोकांना जागृती करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील पुढेही सुरू ठेवण्याची गरज आहे. संजय जाधव यांनी मेडिकल सायंकाळी पाचनंतर बंद होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. डॉक्टर राहुल फासे यांनीही शहरातील ओपीडीमध्ये नागरिकांची गर्दी वाढल्याचे सांगितले. यामागे लोकांमध्ये असलेली भीती हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

नियोजन सभापती वाटेगावकर यांनी जनजागृतीबाबत नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय आणि तसेच नागरी आरोग्य केंद्राने आराखडा तयार करावा, अशी सूचना केली. तर विरोधी गटनेते सौरभ पाटील यांनी बैठकीत डॉक्टरांची उपस्थिती अल्प असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनीही मंडई बाबतचा मुद्दा उपस्थित केला. नगरसेवक, डॉ. गुरसाळे, दादा शिंगण, डॉ. वैभव चव्हाण यांनी विविध सूचना केल्या. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनीही कराड नगरपरिषदेच्या मीच माझा रक्षक या अभियानात सर्वांनी सहकार्य करण्याचे तसेच वैद्यकीय व्यावसायिकांनी नगरपरिषदेच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायोजनाना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुढील सोमवारी पुन्हा डॉक्टर्सना या बैठकीस बोलावण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या