
कराड पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवड मंगळवारी पीठासन अधिकारी आतापर्यंत उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्या अपेक्षेप्रमाणे सभापतीपदी राष्ट्रवादीचे सदस्य प्रणव ताटे यांची वर्णी लागली तर उपसभापतीपदी रमेश देशमुख यांना पुन्हा संधी देण्यात आली .
24 सदस्य संख्या असणाऱ्या कराड पंचायत समितीत कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील गटाचे सात तर विलासराव पाटील-उंडाळकर गटाचे सात सदस्य आहेत. भाजपप्रणित डॉक्टर अतुल भोसले गटाचे 6 तर काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सत्ता स्थापन करताना नामदार बाळासाहेब पाटील व विलासराव उंडाळकर यांनी आघाडी करत सभापतिपद सव्वा सहा वर्षासाठी ठरवून घेतले होते. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षात पहिली सव्वा वर्षे राष्ट्रवादीच्या शालन माळी तर पुढची सव्वा वर्ष उंडाळकर गटाच्या फरीदा इनामदार यांना सभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली.
पुढील अडीच वर्षासाठी चे आरक्षण जाहीर झाले असून ते अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील व विलासराव उंडाळकर गट एकत्रित सत्ता स्थापन करत असून मंगळवारी सभापती निवडीत राष्ट्रवादीचे प्रणव ताटे यांचा सभापतीपदासाठी एकच दाखल झाला तर उपसभापती पदासाठी उंडाळकर गटाकडून रमेश देशमुख यांचा एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या. अपेक्षेप्रमाणे सभापतीपदी प्रणव ताटे यांची निवड झाली तर उपसभापती रमेश देशमुख यांना पुन्हा संधी मिळाली.
पीठासन अधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार तसेच सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन सभापती उपसभापती यांचे अभिनंदन केले. दरम्यान निवड जाहीर होताच नामदार बाळासाहेब पाटील, विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती बाहेर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

























































