कराड – अचानक पेट घेत दुचाकी जळून खाक

394

कराड येथील मुख्य बाजारपेठेत भरदुपारी अॅक्टिवा दुचाकीने पेट घेतल्याने बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खळबळ उडाली. अवघ्या काही मिनिटात भीषण आगीत दुचाकी जाग्यावरच जळून खाक झाली. या घटनेमुळे दत्ता चौक ते आझाद चौक रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

कराडच्या दत्त चौकालगतच्या मयूर एजन्सीसमोर एका ग्राहकाने दुचाकी पार्कींग केली होती. दुचाकी पार्क करून गाडी मालक दुकानात गेला होता. त्याचवेळी पार्कींगमधे लावलेल्या दुचाकीतून अचानक धूर येऊन दुचाकीने पेट घेतला. क्षणार्धात दुचाकी जळून खाक झाली. नागरिकांनी अग्निशमन दलास याची माहिती दिली. दरम्यान अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे कोणताही मोठा अनर्थ घडला नाही. कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली. दरम्यान कराडच्या मुख्य बाजारपेठेेत या दुचाकीने पेट घेतल्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्मााण झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या