सुशांत सिंहची आत्महत्या आणि ट्रोलिंगमुळे करण जोहर रडून बेजार, जवळच्या मित्राने दिली माहिती

2234

अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. नेटकर्‍यांनी प्रामुख्याने निर्माता दिग्दर्शक करण जोहरला लक्ष्य केल्यामुळे करण अस्वस्थ झाला आहे. करण जोहर सारखा रडत असल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली आहे.

बॉलिवूड हंगामाने याबाबत वृत्त दिले आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येमुळी करण आधीच अस्वस्थ होता. त्यानंतर नेटकर्‍यांनी त्याला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. करणला नेटकर्‍यांनी पहिल्यांदाच ट्रोल केलेले नाही. यापूर्वीही त्याच्या सिनेमावरून, कॉफी विथ करण आणि त्याच्या सेक्शुअलिटीवरून नेटकर्‍यांनी त्याला ट्रोल केले होते. परंतु आताच्या ट्रोलिंगमुळे करण खूपच दुःखी झाला आहे. करण जोहर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. पण सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या सोशल मीडियावर काही पोस्ट केल्याचे दिसत नाही. नेटकर्‍यांनी त्याला अनफॉलो करण्यासाठी मोहीमच हाती घेतली होती. त्यानंतर त्याचे फॉलोअर्सही कमी झाले होते.

करणच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या सहकार्‍यांन ट्रोल केल्यामुळे तो जास्त दुःखी आहे. अनन्या पांडेला लोक सध्या ट्रोल करत आहेत. तसेच करणच्या जुळ्या मुलांना मारण्याची धमकी दिल्याने करण खूपच अस्वस्थ आहे. करण बोलण्याच्या अवस्थेत नाही, तो आतून कोसळला असून त्याच्यात प्रतिकार करण्याची शक्तीच नसल्याची माहिती करणच्या मित्राने दिली आहे. मी एवढे काय केले की मला हे सहन करावे लागे असा प्रश्न करण विचारत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या