विचित्र कपडे घालून दिली पोझ, नेटकऱ्यांकडून करण जोहर ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेचा विषय ठरलेला निर्माता दिग्दर्शक करण जोहर आता त्याच्या कपड्यांमुळे ट्रोल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये त्याने घातलेल्या कोटामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.

पॅरिस येथील गुची या ब्रँडसाठी आयोजित शोमध्ये करणही सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने परिधान केलेल्या कोटाच्या बाह्या पाहून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. काही जणांनी त्याला जोकर म्हटलं. तर काही जणांनी त्याची तुलना शोलेतल्या ठाकूरशी केली. काही नेटकऱ्यांनी हा कोट बनवणाऱ्या डिझायनरने पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर स्थायिक व्हावं असंही म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी फॅशन ट्रेंडवरही टीका केली आहे. डिझायनर्स अशा प्रकारचे डिझाईन्स कुठून घेऊन येतात, अशीही विचारणा काही नेटकऱ्यांनी केली आहे.


View this post on Instagram

#natashapoonawalla with #karanjohar at the gucci show in Paris @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

summary- karan johar got trolled over his costume