
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स हा चित्रपट तमाम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. बॉक्स ऑफिसवरही त्याचे पडसाद दिसून येत आहेत. हा चित्रपट 200 कोटींच्या घरात गेला आहे. त्यावर अनेक मान्यवर प्रतिक्रिया देत आहेत. यात आता करण जोहरचीही भर पडली आहे.
द कश्मीर फाइल्स या चित्रपटाविषयी अक्षय कुमार, अजय देवगण इत्यादी सेलिब्रिटींनी कौतुकाचे उद्गार काढले आहेत. या यादीत आता निर्माता दिग्दर्शक करण जोहर याचाही समावेश झाला आहे. करण याने नुकतंच द कश्मीर फाईल्सविषयीचं आपलं मत व्यक्त केलं आहे.
एका मुलाखतीत करण म्हणाला की, हा एक चित्रपट नसून एक आंदोलन आहे. हा चित्रपट बिग बजेट नसला तरीही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. हिंदुस्थानी चित्रपटच्या इतिहासातला हा सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. अशा प्रकारचं आंदोलन जय संतोषी मां नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया करण याने दिली आहे.
करण पुढे म्हणाला की, तुम्हाला हे तर मान्य करावंच लागेल की या चित्रपटात असं काही आहे, ज्यामुळे सगळा देश त्यांच्या दुःखासोबत जोडला गेला. खरंतर तुम्हाला खूप काही समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल, असं करण यावेळी म्हणाला.




























































