काँग्रेसला आणखी एक धक्का, जिल्हाध्यक्ष ससाणे यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress-logo

सामना प्रतिनिधी । नगर

श्रीरामपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबते सुरू झाली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काल ससाणाचे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी पक्षाची भूमिका आपण लवकरच जाहीर करू असे सांगितले होते. पण तत्पूर्वी नव्याने नियुक्त केलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपण वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगून आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यानंतर काँग्रेसची पंचाईत झाली आहे. नगरमध्ये काँग्रेसला बसणारे धक्के महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा दाखवत असल्याचे देखील बोलले जात आहे.

karan-sasane-nagar