करिश्मा कपूर ओटीटीवर..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
कपूर घराण्यातील पडद्यावर आलेली पहिली मुलगी म्हणजे करिश्मा. करिश्मा कपूरने १२ वी सोडा १० वी पर्यंतचेही शिक्षण पूर्ण केलेले नाही.

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आलेय. करिश्मा पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. ती प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनय देवच्या वेबसीरीजमध्ये झळकणार आहे.

ही अभिनय देव यांची डेब्यू सीरीज आहे. अद्याप वेबसीरीजचे नाव निश्चित झालेले नसले तरी यामध्ये करिश्मा  दमदार भूमिकेत दिसेल. तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यादेखील प्रमुख भूमिकेत आहेत. या वेबसीरीजचे शूटींग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. याआधी करिश्माने ‘मेंटलहूड’ सीरीजमधून ओटीटीवर पदार्पण केले होते. प्रेम कैदी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. कुली नंबर 1, राजाबाबू, राजा हिंदुस्थानी, दिल तो पागल हैं या चित्रपटांत तिने  अभिनय कौशल्य दाखवले आहे.