कर्जत शहरात प्रतिबंधक औषध फवारणी

कोरोनाबाबत प्रतिबंधकात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कर्जत शहरामध्ये सोडियम हायड्रोक्लोराईटने निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे, कर्जत नगरपरिषद क्षेत्रात अग्निशमन दलाच्या गाडीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या आदेशानुसार तसेच यांच्या देखरेखीखाली नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरातून या निर्जंतुकीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली.अग्निशमन दलाच्या गाडीवर असलेल्या जेट स्प्रेव्दारे ही फवारणी करण्यात येत आहे, यावेळी अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे, मारुती रोकडे, दिनेश हिरे यांनी फवारणी केली यावेळी नगपरिषदेचे अधिक्षक जितेंद्र गोसावी, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे उपस्थित होते.

नगरपरिषद कार्यालयापासून फवारणी सुरू करण्यात आली. ती मुख्य बाजारपेठ, जकात नाका, छत्री केंद्र, कोतवाल नगर आदी परिसरात करण्यात आली. रोज नगरपरिषद क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी ही फवारणी करण्यात येणार आहे, कोतवालनगर मध्ये फवारणी दरम्यान नगरसेविका स्वामिनी मांजरे, नगरसेवक बळवंत घुमरे, माजी नगरसेवक संतोष पाटील उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या