सीमा भागात भाजपच्या विजयाचा उन्माद; दहशत माजवली, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील सत्ता गेली तरी काही ठिकाणी भाजपच्या विजयाचा उन्माद मात्र दिसून आला. बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या घरावर दगडफेक केली. घरात फटाके पह्डून दहशत माजवली. तसेच धामणे येथे फटाके टाकून गवताच्या गंजीला आग लावल्याने समितीचे कार्यकर्ते भैरू धर्म आणि ग्रामपंचायत सदस्य एम. आर. पाटील यांचे मोठे नुकसान झाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिक सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्र्यांनी प्रचार केला. मराठी भाषिकांविषयी नेहमी दुटप्पी भूमिका घेणाऱया भाजपच्या नेत्यांना मराठी भाषिकांनी काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला होता. सत्ता आणि धनशक्तीच्या विरोधात लढा देणाऱया महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांचा पराभव झाला तरी मतांची वाढलेली टक्केवारी तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभांमुळे मराठी भाषिकांना लढण्याचे बळ मिळाले. याचेच पोटशूळ बेळगाव दक्षिणमध्ये दिसून आले.

बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार अभय पाटील यांची विजयी मिरवणूक निघाली असताना होसुर येथील समितीच्या माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या घरावर दगडफेक करून सीसीटीव्ही पॅमेरा पह्डला. घरात फटाके पह्डल्याने साहित्याचे नुकसान झाले आहे. यामुळे रमाकांत काsंडुसकर आणि भातकांडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

दरम्यान, धामणे येथेही भाजप कार्यकर्त्यांनी समिती कार्यकर्त्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी फटाके गवताच्या गंजीवर टाकल्याने गंजीला आग लागली. त्यामुळे शेतकरी भैरू धर्म आणि एम. आर. पाटील यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतल्याने मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला.