भाजप आमदार पुत्राला लॉकडाऊनचा विसर, हायवेवर पळवला घोडा

1759

कोरोनाचे संकट पाहता देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत असताना कर्नाटकात भाजपच्या आमदार पुत्राला लॉकडाऊनचा विसर पडलेला दिसतोय. भाजपचे आमदार सीएस निरंजन यांचे पुत्र हायवेवर घोडा पळवताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकर्‍यांनी भाजपला धारेवर धरले आहे.

कर्नाटकचे सत्ताधारी पक्षाचे आमदार निरंजन कुमार यांचे पुत्र भुवन कुमार एका हायवेवर घोडा पळवताना दिसत आहे. ट्विटरवर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून कायदे केवळ सामान्य माणसांसाठीच असतात का? असा सवाल विचारला आहे. निरंजनने कुठल्याही प्रकारचा मास्क घातला नव्हता. म्हणजेच त्याने लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे.
या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही अशी माहिती स्थानिक अधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच याबाबत पुढील तपास सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकात आतापर्यंत 862 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात हा आकडा 70 हजारच्या वर गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या