कर्तारपूर कॉरिडॉरमागे आयएसआयचे कारस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्यामागे आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे गंभीर कारस्थान असू शकते, अशी भीती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रविवारी व्यक्त केली. मोदी सरकारने पाकिस्तानशी कसलीही चर्चा करू नये अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. पाकिस्तानने बहुप्रतिक्षित कर्तारपूर कॉरिडॉरची आपल्या दिशेकडील मार्गिका 9 नोव्हेंबरला खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर कॅप्टन सिंग यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. इतर शीख बांधवांप्रमाणेच मीसुद्धा श्री कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये नतमस्तक होण्याचा विचार करून प्रचंड खूश आहे. मात्र पंजाबमधील अलीकडच्या आयएसआयच्या वाढत्या कारवाया लक्षात घेतल्यास कर्तारपूरमागेही पाकिस्तानचे गंभीर दहशतवादी कारस्थान असू शकते, अशी शक्यता कॅप्टन सिंग यांनी व्यक्त केली.