माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानला जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानला जाणार आहे. करतारपूर साहिब कॉरिडॉरचे उद्घाटन 9 नोव्हेंबरला होणार आहे. या कार्यक्रमासाठी मनमोहन सिंग पहिल्या शीख जथ्थ्यासोबत जाणार आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना त्यांना पाकिस्तानला येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु मनमोहन सिंग यांनी हे आमंत्रण फेटाळले होते. यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना पहिल्या शीख जथ्थ्यामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. कॅप्टन अमरिंदर सिंग हे आमंत्रण मनमोहन संग यांनी स्वीकारले आहे. पंजाब सरकारच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. परंतु मनमोहन सिंग यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

9 नोव्हेंबरला करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हिंदुस्थानमधून पहिली जथ्था रवाना होणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वामध्ये हा शीख भाविकांचा जथ्था रवाना होणार आहे. सुल्तानपूर लोधी येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मनमोहन सिंग हे देखील पहिल्या जथ्थ्यासोबत जाणार आहेत.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही गुरू नानकदेव यांच्या 550 व्या प्रकाश पर्व दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. दोघांनीही आमंत्रणाचा स्वीकार केल्याचे पंजाब सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. परंतु पंतप्रधान आणि राष्ट्रपती या कार्यक्रमात सहभागी होणार अथवा नाही याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.