धाडसी सफरीवर… कार्तिकेय-2

निखिल सिद्धार्थचा ‘कार्तिकेय-2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. श्रीकृष्णाच्या रहस्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना जीवनातील अनोख्या धाडसी सफरीवर घेऊन जातो.

याविषयी निखिल सिद्धार्थ सांगतो, श्रीकृष्णाच्या गाथेमुळे प्रभावित न झालेली अशी एकही व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही. ‘कार्तिकेय-2’ची कथा त्यावरच आधारित आहे. कठीण काळात आपण सर्वांनी कधी ना कधी परमेश्वराचा धावा केलाच असेल. या चित्रपटातही आपल्याला असंच काहीसं दिसेल. म्हणूनच हा चित्रपट अधिक विश्वासार्ह झाला आहे. तो पुढे म्हणाला, माझ्या मते लोकांनी या चित्रपटाचा प्रसार केला.  हा चित्रपट साधारण यशस्वी होईल, अशी आमची अपेक्षा होती, पण 50 दिवसांनंतरही तो चित्रपटगृहांमध्ये प्रसारित होत राहिला. त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार.