कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार

मराठा समाजाच्या पाच मागण्या स्थानिक प्रशासनाने मान्य केल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेला असलेला मराठा समाजाचा विरोध मावळला आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  महापूजेला विरोध करण्यावरून सकल मराठा समाजातही दोन गट पडले होते. अखेर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि सकल मराठा समाज आंदोलक यांच्या बैठकीत याबाबत तोडगा निघाला आहे.