
बीड येथील मस्साजोगप्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे गुंड असून त्यांची लवकरच अजित पवार गटातून हकालपट्टी होईल, असा दावा मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी आज केला.
करुणा शर्मा यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. गुंडांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तशी पावलेही त्यांच्याकडून उचलली जात आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंवर ते कारवाई करतील, असे त्या म्हणाल्या. राज्य महिला आयोगावरही यावेळी करुणा शर्मा यांनी टीका केली. राजकीय व्यक्तीविरोधातील तक्रारीची दखल महिला आयोग घेत नाही, असा आरोप त्यांनी केली. तसेच महिला आयोगावर अराजकीय महिलांची नेमणूक केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.