पेट्रोलचा खर्च वाचविण्यासाठी तरुणाने बनवली सौरऊर्जेवरील सायकल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱया किमतीवर तेलंगणामधील एका तरुणाने अनोखा तोडगा वाढला आहे. या तरुणाने चक्क सौर ऊर्जेवर चालणाऱया सायकलची निर्मिती केली असून महिनाभरात त्याने आपल्या प्रवासावर खर्च होणाऱया पाच हजार रुपयांची बचत केली आहे.

कारंगल येथील गोपालपुरम गावात राहणाऱया राजकुमार मुप्पारापू याने ही सायकल तयार केली आहे. दररोज घरापासून ऑफिसला जाण्यासाठी त्याला 20 कि.मी. अंतर कापावे लागते. हे अंतर तो बाईकवरून पार करायचा.

इंधन दरवाढीमुळे प्रवासावरच जास्त पैसे खर्च होत असल्याने महिन्याच्या शेवटी हाती काहीच शिल्लक राहत नव्हेते. त्यामुळे ई-सायकल बनवण्याची कल्पना त्याला सुचली. बाजारातील महागडय़ा ई-सायकलची किंमत राजकुमारला परकडणारी नव्हती. त्यामुळे त्याने स्वत: सायकल बनवण्याचे ठरकले. त्यासाठी त्याने इलेक्ट्रिशियन असलेल्या आपल्या वडिलांची मदत घेतली. डोक्यातली कल्पना प्रत्यक्षात उतरवत अवघ्या दहा दिवसांत त्यांनी ही सायकल बनवली आहे.

  • सायकलला 12 कॉल्टची बॅटरी बसविण्यात आली असून ही बॅटरी चार्ज करण्यासाठी डाव्या बाजूला सोलार पॅनल बसवण्यात आले आहे. अवघ्या 20 हजार रुपयांत सायकल तयार झाली आहे.
  • सोलार पॅनलकर चालणाऱया या सायकलमुळे पैशांची बचत तर होतेच त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षणदेखील होतेय. आपल्या काही मित्रांनादेखील राजकुमारने अशा सहा सायकल बनवून दिल्या आहेत.