श्री काशी विश्वेश्वर : आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच आहे

>>  निळकंठ कुलकर्णी

सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्द हतपापबृन्दम् ।
वाराणसीनाथमनाथनाथ श्रीविश्वनाथं शरण प्रपद्ये ।।

विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. जगाच्या प्रलयकांतात शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून विख्यात आहे. याचं नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगा मधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठी येतात असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच आहे असे त्यांना वाटते.

कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने मला कुणी चिडवणार नाही, अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली. त्यामुळे शंकर येथे येऊन राहू लागले तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले.

कथा –

कथेनुसार महाराज सुदेवचा पुत्र राजा दिवोदासने गंगा तटावर वाराणसी नगर निर्माण केलं. एकदा भगवान शंकर यांनी बघितलं त्यांची पत्नी पार्वतीला तिच्या माहेरी हिमालय क्षेत्रामध्ये राहण्यासी संकोच होता. त्यासाठी त्यांनी कोणत्यातरी दुसऱ्या सिद्ध क्षेत्रामध्ये राहण्याचा विचार केला. त्यांना काशी खूप सुंदर वाटली. ते काशी नगरीस आले. भगवान शिव यांच्या सानिध्यात राहण्यासाठी काही देवता सुद्धा काशीस आलेत. राजा दिवोदास त्याच्या राजधानी काशीचा अधिपत्य जाण्याने ते खूप दुःखी झाले. त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्म देवाजवळ वरदान मागितलं. देवता देव लोकांत राहून देत आणि भूलोक ( पृथ्वी ) ही मनुष्यासाठीच राहून देत सृष्टी निर्मात्याने ऐवमस्तू म्हटलं आणि फलस्वरूप भगवान शंकरांना आणि सर्व देवांना काशी सोडून जाण्यास भाग पाडले. भगवान शंकर हे मन्दराचल पर्वतावर गेले तरी काशी विषयी त्यांचा मोह कमी नाही झाला. महादेवाना त्यांच्या प्रिय काशीमध्ये पुन्हा जाण्यासाठी त्या उद्देशाने चौसष्ट योगिनी, सूर्यदेव , ब्रह्मदेव आणि नारायण यांनी खूप प्रयत्न केला. श्री गणेशच्या सहयोगाने अन्ततोगत्वा हे अभियान सफल झालं आणि ज्ञानोपदेश मिळवुन राजा दिवोदास विरक्त झाला. त्याने एक शिवलिंगाची स्थापना करून त्यांची पूजा अर्चना करून त्यानंतर दिव्य विमानी बसून कैलासाला गेला व महादेव शंकर काशीस आले. काशीच एवढा माहात्म्य आहे की सर्वात मोठे पुराण असलेल्या स्कन्दपुराणामध्ये काशीखण्डच्या नावाने एक विस्तृत पृथक विभाग आहे.

काशीची बारा प्रसिद्ध नावे –

काशी वाराणसी, अविमुक्त क्षेत्र, आनन्दकानन, महाश्मशान, रुद्रावास, काशिका, तप:स्थली, मुक्तिभूमि, शिवपूरी, त्रिपुरारिराजनगरी आणि विश्वनाथ नगरी

स्कन्दपुराणातील काही ‘ काशी महिमा ‘ –

भूमिष्ट।पिन यात्र भूस्त्रिदिवतोsप्यूच्चेरध: स्थापिया या बद्धाभूविमुक्तीदा स्यूरमृतंयस्या मृताजन्न्तत: ।
या नित्यंत्रिजगपवित्र तटीनीतीरे सुरै: सेव्यते सा काशी त्रिपुरारिराजनगरी पायाज्जगत ।।

जे भूतलावर असून सुद्धा पृथ्वीशी संबंध नाही, जो जगातील सर्व बंधनामध्ये बंदी असून सर्वांचे सर्व बंधनं कापून (मोक्षदायिनी) आहे. जे महात्रिलोक पावनी गंगाच्या तटावर सुशोभित अंक सर्व देवतांनी भरलेली तसेच भगवान विश्वनाथाची राजधानी काशी संपूर्ण जगाची रक्षा करो. सनातन धर्म ग्रंथाच्या अध्यायामधून काशीला लोकोत्तर स्वरूप प्राप्त झाले आहे. असं म्हटलं जातं की अंत:प्रलय होण्याने सुद्धा याचा नाश होऊ शकत नाही. वरुणा आणि असि नामक नदी यांच्यामध्ये पाच कोशामध्ये असल्याकारणामुळे वाराणसी असे सुद्धा बोलतात. काशी नावाचा अर्थ सुद्धा असाच आहे. जेथे ब्रह्मदेवाचा प्रकाश आहे, तोपर्यत भगवान शंकर काशीला कधी सोडू शकत नाहीत. जेथे देह त्यागून प्राणी मुक्त होतात, तेच हे काशी क्षेत्र आहे. सनातन धर्मानुसार त्यांचा एक दृढ विश्वास आहे की काशी मध्ये देहावसान करण्याच्या वेळी भगवान शंकर मरणोत्तर प्राण्याला तारकमंत्र सांगतात, याने त्या जीवाला तत्वज्ञान मिळतं.

यत्र कुत्रापिवाकाश्यामरणेसमहेश्वर: ।
जन्तोर्दक्षिणकर्नतुमत्तारंसमुपादिशेत ।।

काशी मध्ये कुठेही मृत्यूच्या वेळी भगवान विश्वेश्वर प्राणीच्या उजव्या कानामध्ये तारकमंत्राचा उपदेश देतात. तारकमंत्र ऐकून जी सर्व भवबंधनातून मुक्त होतात. अशी मान्यता आहे की, काशी मधून मुक्ती मिळते आणि इतर सर्व तीर्थ स्थान काशीला प्राप्त करूनच मोक्ष प्रदान करतात.

अन्यानिमुक्तीक्षेत्राणिकाशीप्राप्तीकराणिच ।
काशीप्राप्य विमुच्चेतनान्यथातीर्थकोटिभि: ।।

संपूर्ण काशी हे विश्वाचे अधिपती भगवान विश्वनाथाचे आधीभौतिक स्वरूप आहे काशी हे पूर्ण काशीला ज्योतिर्लिंगाचे स्वरूप मानतात.

अविमुक्तमहत्क्षेत्र पंचक्रोशपरीमितम् ।
ज्योतिलंगप्तदिकंहि ज्ञेयंविश्वेराभिधम् ।।

काशीला अनेक विद्वानांनी काशी मरणमुक्ती च्या सिद्धांतात समर्थन करत असताना खूप काही लिखाण केले आहे. रामकृष्ण मिशनचे स्वामी शारदानंदजी याच्या द्वारा लिखित श्रीरामकृष्ण लिला प्रसंग नावाच्या या पुस्तकामध्ये श्रीरामकृष्ण परमहंस देवाचे या विषयांमध्ये प्रत्येक्ष अनुभव वर्णिती आहे. हे दृष्टनंत बाबा विश्वनाथ द्वारा काशी मध्ये मृत प्राण्याला तारकमंत्र प्रदान मुक्ती दिली जाते. पण हे ही लक्षात ठेवा की काशीमध्ये पाप करणाऱ्याला सुद्धा मरणोपरांत मुक्ती मिळण्याच्या अगोदर अतिभयंकर भैरवी यातना सुद्धा भोगाव्या लागतात काशी मध्ये प्राण त्यागनाऱ्याला पुन्हा त्यांना पुन जन्म होत नाही.

ऐतिहासिक माहिती –

काशी सर्वात प्राचीन स्थान आहे हे साप्त पुरणांपैकी एक 51 शक्तींपैकी एक आहे. काशीवर मुस्लिम आक्रमणे अनेकदा झाली. इ.स 1033 मध्ये गजनीच्या महमदाने काशी लुटली होती. तुलसिदासानी रामचरित्र मानस ग्रंथ रचना काशीत केली. संत एकनाथानी भगवंत व रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे लेखन याच पवित्र ठिकाणी केले म्हणूनच काशीचे महत्व वेगळे आहे.

हे मंदिर ऐतिहासिक काळात निर्माण झाले होते, असे मानले जाते. इसवी सन 1776 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठी रक्कम दान केली होती. लाहोरचे महाराजा रंजितसिह यांनी मंदिराच्या शिखरासाठी एक हजार किलो सोने दान दिले होते. 1983 मध्ये उत्तरप्रदेश सरकारने मंदिराचे व्यवस्थापन आपल्या हातावर घेतले आणि काशीचे माजी नरेश विभूती सिह यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती केली.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या