काटगावमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काटगाव येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकुण 59 हजार 280 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या चोरी प्रकरणी नागनाथ विठ्ठल माळी (वय 63, रा. काटगाव) यांनी गातेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता घर बंद करून तक्रारदार बाहेरगावी गेले होते. शनिवारी सायंकाळी 5 वाजता परत आले तर त्यावेळी घराचे कुलूप तोडलेले होते. घरात गेल्यानंतर घरातील कपाटही उघडे दिसले. कपाटातील रोख रक्कम 5 हजार रुपये व 54 हजार 280 रुपयाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे तक्रारदारांनी सांगितले. 18 ऑगस्टला या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी सिरसाठ हे करीत आहेत.