कतरिनाने केली जगावेगळी आरती, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ढोल ताशांच्या गजरात, उत्साही वातावरणात काल गणरायाचे आगमन झाले आहे. बॉलिवूड दबंग सलमान खान याची लहान बहीण अर्पिता खान हिच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अर्पिताच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. अर्पिताचे कुटुंबीय आणि काही खास मित्र मैत्रिणी गणरायाची आरती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओवरून अभिनेत्री कतरिना कैफ हिला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. कतरिना ही गणरायाची आरती करताना गणरायाला जगावेगळ्या पद्धतीने ओळताना दिसली आहे.

सलमानची मोठी बहिण अलविरा खान हिचा नवरा व अभिनेता अतुल अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. साधारणत: आरती ओवाळताना डावीकडून उजवीकडे ओवाळली जाते मात्र या व्हिडीओत कतरिना आरती ओवाळताना उजवीकडून डावीकडे ओवाळताना दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.