Photo – कायडू लोहारचा पारंपरिक साज; ‘रॉयल’ लूकने चाहत्यांचे वेधले लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री कायडू लोहार आपल्या सहजसुंदर सौंदर्याने आणि प्रभावी अभिनय शैलीने सध्या फॅशनप्रेमी तसेच चित्रपट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. कायडूने नुकत्याच केलेल्या एका पारंपरिक फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या नव्या फोटोशूटमधून तिने ग्लॅमरस आणि पारंपरिक अशा दोन्ही रूपात स्वतःला तितक्याच ताकदीने सिद्ध केले आहे. साडी, हातात बांगड्या, केसात फुल, कपाळावर टिकली आणि कानातले अशा पारंपारिक लूकमध्ये कायडू अत्यंत सुंदर दिसत असून चाहत्यांच्या नजरा हटेनाशा झाल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेण्ट्सचा पाऊस पाडला आहे.