टॉयलेटची कळ 2 तासांपर्यंत अशी करा नियंत्रित; पाहा व्हिडीओ

अनेक वेळा लांबचा प्रवास आणि तासांचा ट्राफिक जाम यामुळे केवळ मानसिक त्रासच नाही तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच जर टॉयलेट प्रेशर आला तर खूप समस्या होते. गर्दीने भरलेले मार्केट, वाहतूक कोंडी यामुळे टॉयलेट प्रेशर रिलीज करण्यासाठी जागा शोधणे कठीण होते. आज आम्ही तुम्हाला 2 तासांपर्यंत टॉयलेट प्रेशर कसं नियंत्रित करावे याबद्दल सांगणार आहोत.

अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेले पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी टॉयलेट प्रेशर थांबवण्याबद्दल सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांनी पाठक यांना याबद्दल विचारलं होतं. यावर सांगताना पाठक म्हणाले की, आपण आपल्या एका हाताच्या बोटाला दुसऱ्या हाथाच्या बोटानी किंवा पेनने अँटी क्लॉक वाइज दाबून हातात एक चौरस बनवा. असे काही वेळ करून आपण 2 तासांपर्यंत प्रेशर नियंत्रित करू शकता. या पद्धतीस एक्यूप्रेशर असे म्हणतात, असे पाठक यांनी सांगितले आहे. याबद्दल संभाषण करताना बिंदेश्वर पाठक आणि अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिंदेश्वर पाठक यांनी सांगितले की त्यांनी स्वत: ही पद्धत वापरली आहे. ज्यानंतर अमिताभ बच्चन म्हणतात की आपण घरी जात पद्धत वापरणार आहेत.

डॉ. बिंदेश्वर पाठक हे सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक आहेत. यांनी उघड्यावर शौच करणाऱ्या लोकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी खूप काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या