बिहारचे गौतम कुमार झा ठरले तिसरे करोडपती

2367

रिऑलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या अकराव्या सीजनमध्ये एक कोटी रुपयांचे बक्षीस जिंकणारे बिहारचे गौतम कुमार झा हे तिसरे स्पर्धक ठरले आहेत. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील गौतम झा हे रेल्वेमध्ये इंजीनियर असून पश्चिम बंगालच्या आद्रा येथे ते कार्यरत आहेत.

सोनी टीव्हीने आपल्या इन्स्टाग्रामवर याबाबतचा प्रोमो शेयर केला आहे. यात महानायक अमिताभ बच्चन गौतम कुमार झा यांना सात कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारताना दिसत आहेत. मात्र गौतम सात कोटी रुपये जिंकतात की एक कोटींवरच त्यांचा प्रवास थांबतो हे अद्याप कळू शकलेले नाही. या सीजनमध्ये यापूर्वी सनोज राज आणि बबीता ताडे यांनी देखील एक कोटी रुपयांची रक्कम जिंकली होती.

आपली प्रतिक्रिया द्या