KCL 2025 – सलमान निजारने गोलंदाजांच्या नांग्या ठेचल्या; शेवटच्या 12 चेंडूत ठोकले 11 गगनचुंबी षटकार

केरळ क्रिकेट लीगमध्ये कालीकट ग्लोबस्टार या संघाकडून खेळताना सलमान निजारने त्रिवेंद्रम रॉयल्स संघाला अक्षरश: झोडपून काढलं आहे. गोलंदाजांना त्याने सळो की पळो करून सोडलं. 330.76 च्या स्ट्रईक रेटने त्याने फक्त 86 धावांची नाबाद वादळी खेळी केली आहे. विशेष म्हणजे त्याने एकही चौकार मारला नाही. मात्र, षटकारांचा पाऊस पाडायला तो विसरला नाही.

प्रथम फलंदाजी करताना कालीकट ग्लोबस्टार संघाची सुरुवात थोडी खराब झाली होती. 76 धावांवर 4 विकेट अशी संघाची अवस्था होती. परंतु सलमान नाजीने फलंदाजीला येत त्रिवेंद्रल रॉयल्स संघाची दाणादाण उडवून दिली. त्याने 26 चेंडूंमध्ये 12 खणखणीत षटकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने त्याच्या शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 11 षटकार ठोकले आहेत. 19 व्या षटकामध्ये 5 षटकार आणि 20व्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकण्याचा त्याने पराक्रम केला आहे. तर एका चेंडूवर एक धाव काढली आहे. त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे कालीकट ग्लोबस्टार्स संघाने 20 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावांपर्यंत मजल मारली.