केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवेच्या बुकिंगला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर सेवेच्या दुसऱया टप्प्यातील बुकिंगला बुधवारी सुरुवात झाली. भाविक 16 जून ते 25 जून या दरम्यानच्या प्रवासासाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत पोर्टलवरून तिकीट बुकिंग करू शकतील. गुप्तकाशी ते केदारनाथ प्रवासासाठी 10 ते 12 हजार रुपये, फाटा ते केदारनाथ 10 ते 10 हजार 500 रुपये, सिरसी ते केदारनाथ 6 हजार रुपये प्रति व्यक्ती भाडे आकारले जाणार आहे.