बायो-बबलमध्ये दहा हजार खेळाडू ठेवणे अवघड!

टोकियो ऑलिम्पिक अडीच महिन्यांवर येऊन ठेपले आहे; मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे जपानी नागरिकांनीच ऑलिम्पिकच्या आयोजनाला विरोध सुरू केला आहे. एवढेच नव्हे तर, आता तेथील खेळाडूंनीही आपल्या नागरिकांना समर्थन द्यायला सुरुवात केली आहे. नाओमी ओसाकानंतर आता केई निशिकोरी या टेनिसपटूनेही टोकियो ऑलिम्पिकबद्दल प्रश्न केलाय.

दहा हजार खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवणे अवघड काम आहे, असा घरचा आहेर त्याने दिलाय. अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सनंतर आता जपानी टेनिसपटूंनीही टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जपानमध्ये मागील दहा दिवसांत 50 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘एक खेळाडू या नात्याने टोकियो ऑलिम्पिक व्हायलाच हवे असे माझेही मत आहे. मात्र, कोरोनामुळे काही दिवसांतच जपानमधील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल वातावरणात ऑलिम्पिकचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही. ही स्पर्धा स्थगित करावी यासाठी जपानी जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेच्या मताचा नक्कीच आदर व्हायला हवा.’
– नाओमी ओसाका (टेनिसपटू)

आपली प्रतिक्रिया द्या