
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील एक डॉक्टर सोमवार संध्याकाळपासून बेपत्ता आहे. डॉ. अजिंक्य मौर्य असे बेपत्ता डॉक्टरचे नाव असून तो इंटर्न डॉक्टर म्हणून केईएममध्ये काम करत होता. अजिंक्य हा मूळचा जळगावचा असून तो केईएममधील हॉस्टेलमध्ये राहायचा.
सोमवारी संध्याकाळी अजिंक्यने त्याच्या खोलीत मेडीटेशन केले व त्यानंतर तो घराबाहेर पडला. बाहेर जाण्यापूर्वी त्याने त्याच्या मित्राला काहीच सांगितले नाही. अजिंक्यने त्याचा फोन तसेच पैशाचे पाकिट देखील रुमवरच ठेवले. सोमवारपासून अजिंक्यशी काहीच संपर्क न झाल्याने मंगळवारी त्याच्या आई वडीलांनी पोलिसात तक्रार दाखल केली,असे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सांगितले.
अजिंक्य हा त्याची कामाची ड्युटी संपली की कायम अभ्यास आणि मेडीटेशनमध्ये व्यस्त असायचा. त्यामुळे त्याच्या काही मित्रांनी तो इगतपुरी येथील मेडिटेशन सेंटरमध्ये गेला असल्याची देखील शक्यता वर्तवली आहे.
summary : KEM intern doctor goes missing from monday





























































