केरळ बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या तीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलामास्सेरी येथील प्रार्थना केंद्रात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात जबर भाजलेल्या एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 3 झाली आहे. हा स्फोट घडवल्याचा दावा करणाऱया मार्टीन या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, समाजात अविश्वास आणि असहिष्णुतेचे वातावरण पसरवण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून प्रसृत निवेदनात म्हटले आहे. लोकांनीही निराधार आरोप आणि अफवा पसरवण्यात गुंतू नये, असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.