Breaking – केरळच्या 8 पर्यटकांचे नेपाळच्या हॉटेलमध्ये मृतदेह सापडले

720

केरळच्या 8 नागरिकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जबरदस्त खळबळ उडाली आहे. हे सगळेजण नेपाळमध्ये फिरण्यासाठी आले होते. मंगळवारी सकाळी दमन भागातील एका हॉटेलमध्ये या सगळ्यांचे मृतदेह सापडले आहेत. या पर्यटकांची ओळख पटलेली नाही मात्र त्यांचा मृत्यू गॅस हिटरमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हे पर्यटक बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं होतं. मात्र काठमांडूतील रुग्णालयात नेईपर्यंत या सगळ्या जणांचा मृत्यू झाला होता. नेपाळ पर्यटनासाठी केरळहून एकूण 15 जण आले होते, ज्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या हॉटेलमध्ये या पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, ते हॉटेल अत्यंत प्रसिद्ध आहे. इथून पर्वतरांगा आणि बर्फवृष्टीचं अत्यंत सुंदर दृश्य पाहायला मिळतं. यामुळे इथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. प्रचंड गर्दी असल्याने आठही जण एकाच खोलीत राहात होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्यांनी खोलीमध्ये हिटर चालू ठेवला होता आणि दारं-खिडक्या बंद केल्या होत्या. यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या