अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण प्रकरणात भाजपा नेता दोषी, न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

court

केरळमधील कन्नूर येथील पलाथाई येथे चौथी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजप नेते आणि शिक्षक के. पद्मराजन याला पोक्सो न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पद्मराजन याला शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले. के. पद्मराजन हा भाजप त्रिप्पंगोटूर पंचायत समितीचा माजी अध्यक्ष आणि संघ परिवाराशी संलग्न राष्ट्रीय शिक्षक संघाचा (एनटीयू) जिल्हा पदाधिकारी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २०२० च्या जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान घडली. आरोपी के. पद्मराजन याने पलाथायी येथील एका शाळेतील चौथी इयत्तेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केले, असा आरोप होता. आधी शाळेच्या शौचालयात आणि नंतर एका घरात ही घटना घडली, असं बोललं जात आहे. याची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी थालसेरी डीवायएसपींना तक्रार दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.