जगातील सर्वात छोटी गाय… लांबी फक्त दोन फूट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात छोटी गाय केरळमध्ये आहे. या गायीची लांबी फक्त दोन फूट आहे. गायीचे नाव मानिक्यम असून तिचा समावेश गिनीज वर्ल्ड  रेकॉर्डमध्ये झाला आहे. कोझीकोड येथील अंथोली गावातील एन. व्ही. बाळकृष्णन यांच्याकडे ही गाय आहे. मानिक्यम गायीचे वय सहा वर्षे आहे,  तिची लांबी 61. 5 सेमी आहे. बाळकृष्णन यांनी गायीला पाच वर्षांपूर्वी घरी आणले होते.  कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते गायीचं पालन करतात.  गायीची लांबी दोन फुटांपेक्षा जास्त वाढू शकली नाही, असे त्यांनी सांगितले. ही असामान्य गाय असून तिला बघण्यासाठी, तिच्यासोबत पह्टो काढण्यासाठी लोक गर्दी करतात. आमची गाय सेलिब्रेटी झाल्याचं  बालकृष्णन यांचा मुलगा अक्षय नमबुकुडी सांगतो. मानिक्यम गाय केरळमधील वेचुरमध्ये आढळली होती. वेचुर हा भाग कोट्टायम परिसरात येतो. मानिक्यम गाय वेचुर प्रजातीची असल्याचे बोलले जात आहे. वेचुर गायीची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मात्र, डॉ. सोसाम्मा यांच्या कार्यामुळे वेचुर गायींचे संवर्धन झाले होते.