
गेल्या काही वर्षांपासून देशभरात गुन्हेगारी वृत्ती प्रंचड वाढत चालली आहे. याबबातच्या अनेक बातम्या आपल्या दिवसागणीक पहायला ऐकायला मिळतात. पैशांसाठी किंवा संशयावरून, वैयक्तिक वादातून हत्या करणे, महिलांवरील अत्याचार, सगळ्यांसमोर माहिलांची छेड काढून त्यांना त्रास देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशाच एक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
केरळमधील एक कटेंट क्रिएटर बसने प्रवास करत असताना तिला एक अत्यंत वाईट अनुभव आला. याबाबत तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणून सतत त्या मुलीकडे चुकीच्या नजरेले पाहताना दिसत आहे. यावेळी ती तरुणी पारंपारिक केरळा साडी नेसून बसने प्रवास करत होती. यावेळी तिच्या बाजूला तिच्या वडिलांच्या वयाचा एक व्यक्ती बसला होता. आणि तो व्यक्ती त्या तरुणीकडे सारखा चुकीच्या नजरेने पाहत होता. ही गोष्ट लक्षात येताच तरुणीने हा संपूर्ण प्रकार आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. आणि तो सोशल मीडियावरही शेअर केला आहे.
दरम्यान हा व्हिडीओ शेअर करताना त्या तरूणीने व्हिडीओ शेअर करण्यामागच कारणही सांगितलं. ती म्हणाली की, हा व्हिडिओ मी टाकला कारण काही लोक म्हणतात कपडे हेच अशा कृत्याचं कारण आहे! पण व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मी पूर्ण कपडे घातले आहेत. तरी देखील लोकांची मानसिकता काही बदलत नाहीए. आता सांगा, अजूनही कपड्यांचा प्रश्न आहे का? खरं तर प्रश्न तुमच्या नजरेत आहे,” असं कॅप्शन तिने लिहिलं आहे.
तरुणीने पुढे लिहिले की, त्या व्यक्तीची फक्त नजरच चुकीची नव्हती तर त्याने मला चुकीच्या प्रकारे स्पर्श केला. तेव्हा मी त्याला मारले. माझ्या या कृत्यामुळे तो कदाचित घाबरला त्यामुळे तो पटकन बसमधून उतरला आणि पळून गेला. ही आहे लोकांची विकृती! असे तिने सांगितले.
View this post on Instagram
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडिवर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद…कारण अशा घटना महिलांसोबत रोज घडता… पण कोणी याकडे लक्ष देत नाही, असे एका युजरने लिहिले आहे.