केतन पाटील जलद बुद्धिबळ स्पर्धा विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुलुंड

राठमोळं मुलुंड व गौरी महादेव फाऊंंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना मान्यताप्राप्त डॉ. अरविंद प्रधान स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत केतन पाटील अंतिम विजेता ठरला. स्नेहल भोसलेने द्वितीय तर केतन बोरीचाने तृतीय क्रमांक पटकाविला. 6,8,10, 12,15 वर्षांखालील मुले व मुली, प्रौढ पुरुष, महिला गटविजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. पारितोषिके डॉ. आनंद प्रधान यांच्या शुभहस्ते देण्यात आली. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर व राष्ट्रीय टेबल टेनिसपटू ओंकार तोरगलकर यांची या स्पर्धेला विशेष उपस्थिती लाभली.

वरळी-लोअर परळ विभागातील गणपतराव कदम मार्गावरील काळसेकर कंपाऊंडमध्ये राहणारी कराटेपटू ऋतुजा सर्वोत्तम राऊत हिने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल माजी महापौर आणि नगरसेविका स्नेहल आंबेकर यांनी ऋतुजाच्या घरी जात तिचे अभिनंदन केले. ऋतुजा ही ज्येष्ठ शिवसैनिक सर्वोत्तम (बाळा) राऊत यांची कन्या आहे. तिच्या सत्काराप्रसंगी शिवसेना महिला शाखासंघटक प्रतिभा दळवी, युवासेना अधिकारी संकेत सावंत, मंगला पवार हे उपस्थित होते.

mulund-sport मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात रविवारी पार पडलेल्या इंडिया ओपन इंटरनॅशनल कराटे अजिंक्यपद स्पर्धेत मुलुंडकर हरी ओम मार्शल आर्ट अकादमीच्या कराटेपटूंनी चमकदार कामगिरी केली. सेन्साई आनंद पेंडूरकर आणि प्रशिक्षक रवींद्र बंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला कराटेपटू लव तावडे याने कुमीते आणि काता प्रकारात कास्यपदके पटकावली. तर हरी ओमच्याच यश अन्सुलकरने कुमीते आणि काता या दोन्ही प्रकारात अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदकाची कमाई केली.