‘केजीएफ-2’ चे एक तिकीट दोन हजार रुपयांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

‘पुष्पा’, ‘आरआरआर’ या चित्रपटानंतर आता ‘केजीएफ – 2’ हा साऊथचा आणखी एक बडा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. मुंबईतील काही मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे एक तिकीट 1450 ते 1500 रुपयांना, तर दिल्लीमध्ये 1800 ते 2 हजार रुपयांना विकले जात आहे, अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. ‘केजीएफ’च्या यशानंतर ‘केजीएफ -2’ विषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहाचली आहे. मुंबई आणि पुण्यात अगदी सकाळी सहा वाजल्यापासून चित्रपटाचे शो ठेवण्यात आले आहेत. ऍडव्हान्स बुकिंगमधूनच हा चित्रपट 20 कोटी रुपयांचा गल्ला जमवेल, असा अंदाज आहे. 14 एप्रिलला प्रदर्शित होणाऱया या चित्रपटात साऊथ सुपरस्टार यश, रामिका सेन यांच्यासह रवीना टंडन, संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.