दानवे-महाजन यांच्यासमोर खडसे समर्थक सुनील नेवे यांना मारहाण

679

भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड संत हरदास मंगल कार्यालयात होत असताना अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर बैठकीत कार्यकर्त्यांचा चांगलाच गोंधळ झाला. भुसावळ शहराध्यक्ष निवडीकरून हा वाद झाला. वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. यात भाजपचे सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण झाली असून, त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन व भाजपचे आमदार उपस्थित असताना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भुसावळ येथील कार्यकर्त्यांनी आपला आक्षेप नोंदविला व याची दखल घेत असताना काही कार्यकर्ते मंच सोडून भाजपचे भुसावळ येथील नगरसेवक संघटन सचिव सुनील नेवे यांच्या अंगावर शाई फेकली व तोंडाला लावली. त्यावेळेस भाजपच्या उपस्थित गिरीश महाजन व राकसाहेब दानवे यांच्या अंगावर देखील शाई उडाली. धावपळीमध्ये अनेकांच्या अंगावर पडली. हा गोंधळ सुरू असताना रावसाहेब दानवे निवडणुकीचा कार्यक्रम सोडून निघून गेले. यावेळी गिरीश महाजन यांनी सर्वांना शांत करून निवडणुकीचा कार्यक्रम सुरू केला.

आपली प्रतिक्रिया द्या