
वैश्विक
यंदा पाऊस लवकर संपणार म्हणतात. गेल्या वर्षी तो जवळपास ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत रेंगाळत होता. यावेळी तो सप्टेंबरअखेरीस एक्झिट घेण्याच्या बेतात आहे. पूर्वी 7 जूनला नेमेचि येणारा पावसाळय़ाचा हंगाम 30 सप्टेंबरला आवरतं घ्यायचा. परंतु गेल्या विसेक वर्षांत पृथ्वीवरच्या वातावरणात बऱयाच उलथापालथी झाल्यायत. त्या काही एकदम होत नसतात. ही सायलेन्ट प्रक्रिया असते. मात्र त्याची चाहूल लागताच माणसाने सावध व्हायला पाहिजे. पण कसचं काय! समुद्राची पातळी बेसुमार वाढेल. देशोदेशींचे सीझन बदलतील असं सुज्ञ वैज्ञानिक मंडळी सांगत होती. पण आपण काही सुधारत नाही.
खगोल अभ्यासकांना आज मोकळं, स्वच्छ आकाश लवकर, खरं तर वेळेवर मिळालं तर अवकाश निरीक्षणाचा कालावधी वाढेल. गेल्या वर्षी डिसेंबर, जानेवारीतही अवकाळी पावसाने अशा कार्यक्रमांवर पाणी ओतलं. म्हणजे शेतीला हवं तेव्हा नि तेवढं पाणी नाही आणि अवकाश निरीक्षकांना अवकाळी पावसाचा त्रास. या ढासळत्या वातावरणीय समतोलाचा अभ्यास करतच पुढची पावलं उचलावी लागतील.
अर्थात, अवकाशातच फिरणाऱया हबल, चंद्रा पिंवा जेम्स वेबसारख्या दुर्बिणींना पृथ्वीवरच्या वातावरणाचा काही त्रास नसतो. तिथे धोका त्यावर भरकटलेला महापाषाण आदळण्याचा. परंतु हबल, चंद्रा आणि आता जेम्स वेबचं कार्य अजून तरी चांगलं चाललंय. विश्वाच्या अथांग पसाऱयातील नित्यनव्या गोष्टींची माहिती या दुर्बिणी पह्टोसकट पाठवतायत.
याचबरोबर जगातल्या विविध अवकाश संस्था आणि विद्यापीठांमधले खगोल अभ्यासकही विश्वातले नवीन काही सापडतंय का याचा शोध घेतायत. कोरोनाहेगनच्या नील्स बोर विद्यापीठातल्या दोघा अभ्यासकांनी ताऱयांचे एक त्रिकूट शोधून काढलंय. टीआयसी आणि पुढे एक लांबलचक क्रमांक असं त्याचं तांत्रिक नाव आहे. आता ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आकाश स्वच्छ झालं की पश्चिमेला दिसणारा पॅसिओपिया हा इंग्लिश ‘एम’ पिंवा ‘डब्ल्यू’ या आकाराचा दिसणारा तारकासमूह जरूर पहा. आपल्या मराठी पत्रकारितेचे उद्गाते बाळशास्त्र्ााr जांभेकर यांनी त्यांच्या अल्पायुष्यात जी प्रचंड ज्ञानसाधना केली त्यातला एक विषय होता खगोलशास्त्र्ा. पाश्चात्यांनी शोधलेल्या अनेक तारकासमूहांना बाळशास्त्र्ााRनी आपल्या संस्कृतीशी निगडित अशी चपखल नावं दिली. त्यात ‘पॅसिओलिया’चं नाव ‘शर्मिष्ठा’ असं आहे.
तर या शर्मिष्ठा तारका समूहाजवळच या दोन तरुणांना ताऱयांचं जे त्रिकूट सापडलं ते वैशिष्टय़पूर्ण आहे. ताऱयांची एक जोडी ‘द्वैती’ होऊन परस्परांभोवती फिरत असतानाच त्यांच्यापासून दूर पण या दोन ताऱयांपेक्षा प्रचंड आकार, वस्तुमान असलेला तारा याच स्पेनचा (सिस्टिमचा) भाग आहे. हे असे त्रितारे प्रथमच आढळल्याचं त्यांच्यापैकी ओमेप्त नावाचा अभ्यासक म्हणतो.
आपला सूर्य हा एकटा तारा आहे. परंतु ताऱयांच्या अनेक जोडय़ा अभ्यासकांना ठाऊक असतात. अवकाशात ठळकपणे दिसणाऱया मृग नक्षत्रातील राजन्य पिंवा रिगेल ही सुद्धा ताऱयांची जोडगोळीच आहे. मृगात तर ताऱयांना जन्म देणाऱया तेजोमेघापासून, मरणपंथाला लागलेल्या बिटल्ज्युज पिंवा काक्षी ताऱयापर्यंतचे बरेच प्रकार पाहायला मिळतात.
शर्मिष्ठा तारका समूहाजवळच्या या त्रिताऱयांचं दर्शन घ्यायचं तर शक्तिशाली दुर्बिण हवी. परदेशातील विद्यापीठांकडे अशा दुर्बिणी असतात. या तीन-तारा रचनेत जे दोन तुलनेने छोटे तारे परस्परांभोवती फिरतायत ते इतक्या वेगाने फिरतायत की त्यांचा भ्रमणकाळ पृथ्वीएवढा आहे. या दोन ताऱयांचं वस्तुमान मात्र आपल्या सूर्याच्या सुमारे 12 पट अधिक आहे.
तिसरा, दुरून फिरणारा प्रचंड तारा तर सूर्याच्या 16 पट असून तो ज्या दोन ताऱयांभोवती फिरतो त्यांच्या भ्रमणकक्षेपेक्षा या मोठय़ा ताऱयाची कक्षा सहा पटीने जास्त आहे. या ताऱयाचं निरीक्षण करणाऱया या तरुण विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार- तो मोठा तारा आधी अस्तित्वात आला असला तर त्यातलंच काही वस्तुमान (मॅस) बाहेर पडून दोन छोटे तारे तयार झाले नि परस्परांभोवती फिरू लागले.
दुसरी शक्यता अशी की ते ‘द्वैती’ (जोडगोळी) आणि तो मोठा तारा यांचा जन्म वेगवेगळाच झाला असावा आणि नंतर त्यांच्या कक्षा जवळ येत स्थिरावल्या. आणखी एक तर्क म्हणजे जोडताऱयांच्या दोन जोडय़ा (एकूण चार तारे) आधी असाव्यात आणि त्यातील एक जोडगोळी एकमेकात विलीन झाल्याने हा तिसरा महातारा जन्मला असावा. विश्वाचा असा अभ्यास किती छान आहे ना? त्यातूनच विश्वाची अनेक कोडी पुढच्या पिढय़ा उलगडणार आहेत.




























































