लाहोरमध्ये खलिस्तानी नेत्याचा खून, संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप

1006

पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एका खलिस्तानी नेत्याचा खून झाला आहे. हरमीत सिंह उर्फ हॅप्पी पीएचडी असे त्याचे नाव होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याचा खून केल्याचा आरोप हॅप्पी पीएचडीवर होता.

हॅप्पी पीएचडीचा लाहोरच्या गुरुद्वाराजवळ गोळी घालून खून करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये त्याने संघाच्या नेत्याचा खून केला होता. पंजाबमधून त्याने कधीच पलायन केले होते आणि पाकिस्तानमाध्ये आयएसआयच्या आश्रयाखाली होता. पाकिस्तानमध्ये बसून तो खलिस्तान समर्थकांसाठी काम करायचा. तसेच हिंदुस्थानमध्ये तो ड्रग्स पुरवठा करायचा. याबाबत पंजाब पोलिसांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. त्याचा खून स्थानिक गॅगने केल्याची माहिती पाकिस्तानच्या पोलिसांनी दिली. तसेच ड्रग्जच्या पैशांवरून त्याचा खून झाल्याच अंदाज वर्तवला जात आहे.

हरमीस सिंह स्वतःला खलिस्तान लिबरेशन फोर्सचा म्होरक्या सांगायचा. आयएसआयच्या इशार्‍यावर तो पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ चालवत होता.

आपली प्रतिक्रिया द्या