खारकोपर ते बेलापूर ट्रेनला रविवारी ग्रीन सिग्नल; रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

107
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

नेरुळ-सीवूड-बेलापूर ते उरण या नवी मुंबईला उरण शहराशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नेरुळ ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे रविवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. रविवारी सकाळी 11 वाजता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते पहिल्या खारकोपर ते बेलापूर ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारपासून या मार्गावर 20 अप-20 डाऊन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रविवारी रेल्वेमंत्र्याच्या उपस्थितीत पहिली ट्रेन सकाळी 11 वाजता खारकोपर स्थानकातून सुटणार आहे. प्रथम नेरुळ ते खारकोपरपर्यंतचा 12 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे. खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील सुमारे 15 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या मार्गात पाच रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

अशा धावणार फेऱ्या
नेरुळ- खारकोपर – नेरुळ – 20 फेऱ्या ( 10 अप- 10डाऊन )
बेलापूर-खारकोपर-बेलापूर – 20 फेऱ्या (10 अप- 10 डाऊन)

या मार्गाची वैशिष्ट्ये
नेरुळ ते उरण एकूण 27 कि.मी.चा रेल्वे मार्ग
11 रेल्वे स्थानकांचा समावेश
1782 कोटी रुपयांचा खर्च

अशी असतील स्थानके
पहिला टप्पा – नेरुळ, सीवूड, बेलापूर, तारघर, बामनडोंगरी, खारकोपर
दुसरा टप्पा – गव्हाण, रांजनपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी, उरण

summary- kharkopar to belapur train will get start from sunday

आपली प्रतिक्रिया द्या