
राजेश प्रधान । पेण
पेण तालुक्यातील खारसापोली येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख गायकवाड यांच्या उपस्थितीत जगदीश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रविण मारूती म्हात्रे, यांच्या प्रेरणेने खारसापोलीतील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यपध्दतीला कंटाळून शशिकांत म्हात्रे, सुनिल म्हात्रे, अनिल म्हात्रे, संजय म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, सौरभ म्हात्रे, सुमित म्हात्रे, शंकर म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खारसापोलीचा सर्वांगीण विकास करण्याचा व तेथील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही किशोर जैन यांनी दिली. प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवबंधन बांधून स्वागत करण्यात आले.



























































