खेड नगरपरिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आरक्षण सोडतीने निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली आहे. सोमवार दिनांक १3 जून रोजी नगरपालिका प्रशासक तसेच खेडच्या उपविभागीय अधिकारी राजेश्री मोरे यांनी नगरसेवक पदाची आरक्षण सोडत जाहीर केली. खेड नगरपरिषदेच्या हॉलमध्ये हे सोडत जाहीर करण्यात आली.

खेड शहरवासीयांनी सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास सोमवारी 13 जून रोजी उपस्थित राहवे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले होते त्यानुसार आरक्षण प्रांताधिकारी श्रीमती राजश्री मोरे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी हे आरक्षण जाहीर केले.

खेड नगर परिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

प्रभाग 1 अ सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग 2 – अ-सर्वसाधारण महिला, ब -सर्वसाधारण प्रभाग 3-अ-सर्वसाधारण महिला, ब -सर्वसाधारण प्रभाग 4-अ अनुसूचित जाती, ब -सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 – अ-सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग 6-सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग महिला, प्रभाग 7 अ-सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण प्रभाग 8-अ-सर्वसाधारण महिला ब -सर्वसाधारण, प्रभाग 9 सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण प्रभाग 10-अ-सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण असे आहे. नागपरिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी कार्याला सुरवात केली आहे.