कुर्ल्यात सिलिंडर स्फोटात चिमुकलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, मुंबई

कुर्ल्यामध्ये चाळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एका चिमुकलीचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. स्फोटामुळे चाळीला आग लागली. मात्र, अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. कुर्ल्यातील बैलबाजार परिसरातील क्रांतीनगरमध्ये संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली.

सिलिंडर स्फोटात गंभीर जखमी झालेल्या अनुष्का चौरसिया (4) हिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. स्फोटात रवी परमार हा 21 वर्षांचा तरुण जखमी झाला आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.