अपहरण केलेल्या मुलीवर महिनाभर बलात्कार, मुलगी गरोदर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला फूस लावून एका नराधमाने तिचे अपहरण करत महिनाभर तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

हरियाणाच्या सदलपुर येथील जावेद याचे नातेवाई पीडितेच्या गावी राहतात. त्यामुळे त्याचे गावात येणे-जाणे होते. दरम्यान त्याची ओळख गावातील एका अल्पवयीन मुलीशी झाली. त्यानंतर जावेद 3 एप्रिलला तिला फूस लावून सोबत घेऊन आला. 8 एप्रिलला सिद्धमुख पोलीस स्थानकात मुलीच्या वडिलांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.

आरोपी जावेद मुलीला घेऊन हरियाणा येथील छानी, नंतर दिल्ली आणि नंतर बिहारच्या किशनगंज येथे घेऊन गेला. तिथे आरोपीने अपहरण करुन तिच्यावर महिनाभर बलात्कार केला. घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता 12मे रोजी अल्पवयीन मुलगी हरियाणाच्या आदमपुर येथे सापडली. नंतर अल्पवयीन पीडितेची कोरोना चाचणी केली असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तिला चुरुच्या बालकल्याण समितीसमोर उभे केले.

बाल कल्याण समितीने पिडीतेला नारी निकेतनला पाठवले. 4 जूनला पीडितेची वैद्यकीय चाचणी केली असता ती गरोदर असल्याचे समोर आले. न्यायालयासमोर अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. तिथे पीडिता आणि नातेवाईकांची संमती लक्षात घेता न्यायालयाने गर्भपात करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.