लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय, लातुरातून दोन मुलं गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी भागामधून दोन अल्पवयीन मुले पळवण्यात आल्याची घटना घडली. इरफान अशफाक पठाण (7) वर्षे व जुनेद अशफाक पठाण (4) अशी या मुलांची नावे आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द शिवजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेश्मा अशफाक पठाण रा. लक्ष्मी कॉलनी यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 13 तारखेस सकाळी 10 वाजता त्या मुलांना घरी ठेऊन कामाला गेलेल्या होत्या. सायंकाळी 6 वाजता त्या घरी परत आल्यानंतर त्यांना घरात इरफान अशफाक पठाण (7) वर्षे व जुनेद अशफाक पठाण (4) वर्षे हीदोन्ही मुले दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीस फोनवरुन माहिती कळवली. शहरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू मुलांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. 14 तारखेस दुपारी मुले सापडत नसल्याने शेवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.